Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023 Sanjay Gandhi Niradhar Yojana Application Form PDF Sanjay Gandhi Niradhar Yojana Online Registration Sanjay Gandhi Niradhar Yojana List Maharashtra
संजय गांधी निराधार योजना लिस्ट महाराष्ट्र संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे संजय गांधी निराधार योजना form ऑनलाइन
महाराष्ट्रशासनाने sjsa.maharashtra.gov.in या पोर्टल वर संजय गांधी निराधार अनुदान योजना 2023 साठी ऑनलाईन आणि ऑफलाइन अर्ज प्रणाली सुरू केली आहे. 65 वर्षांपेक्षा कमी वयाच्या निराधार लोकांसाठी ही राज्य पुरस्कृत पेन्शन योजना आहे. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023 विषयी संपूर्ण माहिती सांगणार आहोत जसे की- अर्ज कसा करायचा, पात्रता, कागदपत्रे इत्यादि तरी विनंती आहे की आम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.
Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana 2023
संजय गांधी निधार अनुदान योजना ऑनलाईन अर्ज पीडीएफ डाउनलोड जिल्हाधिकारी / तहसीलदार / तलाठी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. या पेन्शन योजने अंतर्गत महाराष्ट्रातील निराधार लोकांना राज्यसरकार कडून मासिक आर्थिक मदत पुरविल्या जाते. इच्छुक वृद्ध लोक महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकद्वारे अधिकृत वेबसाईट वरून अर्ज पीडीएफ डाउनलोड करू शकतात.
संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र 2023
योजनेचे नाव | संजय गांधी निराधार योजना |
---|---|
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | महाराष्ट्रातील नागरिक |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
Sanjay Gandhi Niradhar Yojana PDF Form Download
खाली दिलेल्या लिंक वरुण तुम्ही संजय गांधी निराधार योजना 2023 साठी Pdf Form डाऊनलोड करू शकता.
अर्ज डाऊनलोड करून तुम्हाला अर्जामद्धे विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल आणि आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून जिल्हाधिकारी / तहसीलदार / तलाठी यांच्या कार्यालयात अर्ज जमा करावा लागेल. नंतर तुमच्या अर्जाची छाननी होऊन तुमची संपूर्ण माहिती तपासल्या जाईल आणि तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला दारमाह आर्थिक मदत दिल्या जाईल. ही मदत तुमच्या बँक खात्यात जमा केल्या जाईल.
संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्रता
- 65 वर्ष वयापर्यंतच्या निराधार व्यक्ति.
- अर्जदार हा किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- विधवा स्त्रिया या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.
- अनाथ मुले.
- अपंग व्यक्ति.
- T. B. कर्करोग, एड्स आणि कुष्ठरोग यासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती.
- निराधार घटस्फोटित महिला.
- वेश्या व्यवसाय करणार्या महिला.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21000 पेक्षा कमी असावे.
- अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत असावे.
इत्यादींना संजय गांधी निराधार योजना 2023 (Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2023) अंतर्गत लाभ मिळेल.
संजय गांधी निराधार योजना आवश्यक कागदपत्रे
- वयाचा दाखला (ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला)
- तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.
- रहिवासी दाखला. (ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांचा)
- अपंगाचे प्रमाणपत्र.
- असमर्थतेचा किंवा आजारचा दाखला.(कोणताही दीर्घकालीन आजार असल्यास)
- अनाथ असल्याचा दाखला.
- बँक पासबूक
संजय गांधी निराधार योजना अर्जप्रक्रिया
मित्रांनो, तुम्हाला जर Sanjay Gandhi Niradhar Yojana 2023 Application Form भरायचा असेल तर तो ऑफलाइन पद्धतीने भरावा लागेल, कारण सरकारकडून अजूनपर्यंत संजय गांधी निराधार योजना 2023 साठी ऑनलाइन अर्ज प्रणाली सुरू करण्यात आलेली नाही. खाली दिलेल्या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
- सर्वात आधी तुम्हाला Sanjay Gandhi Niradhar Yojana PDF Form Download करू त्याची प्रिंट काढावी लागेल.
- नंतर तुम्हाला तो अर्ज भरून आवश्यक सर्व कागदपत्रे त्या अर्जाला जोडाव्या लागतील.
- नंतर तो अर्ज घेणू तुम्हाला तलाठी कार्यालयात जावे लागेल आणि तलाठ्याजवळ तुम्हाला अर्ज जमा करावा लागेल.
- तलाठी तुमचा अर्ज तहसील कार्यालयात पोहचवेल नंतर तहसिलदार यांच्या कडून तुमच्या अर्जाची छाननी होईल आणि अधिकृत वेबसाइट वर लाभर्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
मित्रांनो, वरील प्रकारे तुम्ही संजय गांधी निराधार योजना 2023 (Sanjay Gandhi Niradhar Yojana 2023) साठी अर्ज करू शकता. अर्ज करतांना तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेन्ट टाकून विचारू शकता.