गांडूळ खत/नाडेप/सेन्द्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान योजना

पोकरा अंतर्गत गांडूळ खत/नाडेप/सेन्द्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प – गांडूळ खत उत्पादन यूनिट आणि नाडेप कंपोस्ट उत्पादन यूनिट व सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान घटकाची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये या अनुदानाचे उद्दिष्ट्य, लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा, अनुदान किती मिळणार या सर्व गोष्टीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

नैसर्गिक हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितिशी जुळून घेण्यास शेतकऱ्यांना मदत करून सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आला. गांडूळ खत हे शेतातील काडीकचरा, शेण, वनस्पतीजन्य पदार्थ यापासून गांडुळांमार्फत बनविले जाते. या खतामध्ये व्हिटॅमिन, संजीवके, विविध जिवाणू तसेच इतर शेती साठी उपयुक्त जिवाणू असल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते.

शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतीजन्य पदार्थापासून सेंद्रीय खत तयार करणे , निसर्गाचे संवर्धन करणे, आणि हे सेंद्रिय शेतीने शक्य आहे त्यासाठी सेंद्रिय खत शेतात टाकणे ही काळाची गरज आहे. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा कस व जलधारणा शक्ती वाढुन पोषक द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो.जमीन भुसभूशीत राहते. जमिनीत हवा खेळती राहते.शेतात उपयुक्त सूक्ष्म जिवाणुंची वाढ होते. आणि उत्पादनात वाढ होऊन पीक चांगले येते.

गांडूळ खत उत्पादन यूनिट अनुदान उद्दिष्ट्ये –

१. शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ करणे.
२. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पौष्टिक अन्नधान्याचे उत्पादन घेणे.
३. शेतजमिनीची सुपीकता दीर्घकाळापर्यंत वाढवणे.
४. नैसर्गिक घटकांचा वापर करून शेती करणे.
५. नैसर्गिक हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितिशी जुळून घेण्यास शेतकऱ्यांना मदत करून सक्षम बनविणे.

गांडूळ खत उत्पादन यूनिट अनुदान योजनेत कोण सहभागी होऊ शकतात –

  •  अर्जदार २ – ५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ६५% अर्थसहाय्य देय आहे.
  •  प्रकल्प गावातील अल्प/अत्यल्प भूधारक शेतकरी यांना वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी ७५% अर्थसहाय्य देय आहे.

 नाडेप कंपोस्ट उत्पादन यूनिट लाभार्थी पात्रता-

  • ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी त्यामध्ये अल्प/अत्यल्प भूधारक,अनुसूचित जाती जमाती महिला , दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्यक्रमानुसार लाभ देण्यात येईल.
  •  ज्या शेतकऱ्यांकडे गांडूळ खत यूनिट उभारण्याकरिता जागा उपलब्ध आहे अश्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो.
  • इतर कोणत्याही योजनेतून सदर घटकांतर्गत शेतकऱ्याने लाभ घेतलेला नसावा.
  • गांडूळ खत यूनिट उभारल्यानंतर ते व्यवस्थीत सुरु राहण्यासाठी किमान दोन पशुधन उपलब्ध असावेत.

सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान आवश्यक कागदपत्रे-

  • ७/१२ उतारा
  • ८- अ प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जातीजमाती असल्यास)

 सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान खर्चाचा मापदंड-

सेंद्रिय निविष्ठा उत्पादन यूनिट साठी रु.६०००/- असा खर्चाचा माप दंड आहे. तर गांडूळ खत उत्पादन यूनिट/नाडेप कंपोस्ट यूनिटसाठी रु.१००००/- असा खर्चाचा माप दंड आहे. खालील सविस्तर तपशील पाहू शकता

pocra gandul khat praklp schme

सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान अर्ज कुठे करावा –

इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

पूर्वसंमती मिळाल्यानंतर काय करायचे –

लाभार्थी  शेतकऱ्याने पुर्वसंमती मिळाल्यानंतर तांत्रिक निकषाप्रमाणे प्रकल्पाची उभारणी करावी. त्यासाठी लागणारे साहित्य सामुग्री विकत घेऊन प्रकल्पाचे काम पूर्ण करून घ्यावे .  तसेच प्रकल्प यूनिट बांधकाम लाभार्थी यांनी त्यांच्या आवडीच्या  बांधकाम व्यावसायिकाकडून अथवा मंजुरीने करून घ्यावे. आणि अनुदान मिळवण्यासाठी गांडूळ  यूनिटची उभारणीचे काम पूर्ण  झाल्यानंतर ऑनलाईन अनुदान मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांचे कडे करावी.तसेच  सोबत आवश्यक देयके शेतकरी यांनी स्वत:ची स्वाक्षरी करुन ऑनलाईन अपलोड करावीत.त्यानंतर काही कालावधीतच अनुदान थेट लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पअंतर्गत (पोखरा) विविध कृषी योजनांची माहिती खालील लिंकवर क्लिक करा.

Leave a Comment