ट्रॅक्टर अनुदान | Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2023

ट्रॅक्टर अनुदान | Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2023

 

Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2023: नमस्कार मित्रांनो, आज आपण कृषी यांत्रिकीकरण योजना साठी मंजूर झालेल्या २० जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णय GR ची माहिती पाहणार आहोत.

शासन निर्णय

सन २०२२-२३ या वर्ष्यासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी माहे रुपये ५६ कोटी एवढा निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे. हा सदर निधी सन २०२२-२३ करीता अर्थसंकल्पीय केलेल्या तरतुदीतून खर्ची करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणत्या बाबी साठी किती निधी वितरित केला जाणार आहे ते खाली संगितल गेले आहे.

Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra 2023 GR

महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 अंतर्गत मिळणारे अनुदान

उपकरण मिळणारे अनुदान
पंपसेट (७.५ H.P पर्यंत) निर्धारित किमतीच्या ५०% अथवा जास्तीत जास्त १०००० रुपये
ट्रॅक्टर (40 H.P पर्यंत) निर्धारित किमतीच्या 20% अथवा जास्तीत जास्त ४५००० रुपये
पॉवर टीलर (८ H.P किंवा त्यापेक्षा जास्त) निर्धारित किमतीच्या ४०% अथवा जास्तीत जास्त ४५००० रुपये
उस तोडणी यंत्र निर्धारित किमतीच्या ४०% अथवा जास्तीत जास्त २०००० रुपये
पॉवर टीलर (८ H.P किंवा त्यापेक्षा जास्त) निर्धारित किमतीच्या ४०% अथवा जास्तीत जास्त ४५००० रुपये
पॉवर थ्रेशर निर्धारित किमतीच्या ४०% अथवा जास्तीत जास्त २०००० रुपये
विनोइंग फैन, चेफ कटर (मानवचालित) निर्धारित किमतीच्या २५% अथवा जास्तीत जास्त २००० रुपये
ट्रॅक्टर फवारणी यंत्र निर्धारित किमतीच्या २५% अथवा जास्तीत जास्त ४००० रुपये
रोटावेटर निर्धारित किमतीच्या ५०% अथवा जास्तीत जास्त ३०००० रुपये

 

आणखी माहिती साठी आम्ही खाली Krushi Yantrikikaran Yojana 2023 Pdf देत आहोत ते डाऊनलोड करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 साठी आवश्यक कागदपत्र

  • शेतकर्‍याचे आधारकार्ड.
  • बँकेचे पासबूक.
  • 7/12 आणि 8 अ.
  • जे यंत्र खरेदी केले आहे त्याचे original बिल.
  • जर ट्रॅक्टर शेतकर्‍याचे नावावर असेल तरच त्यावर अनुदान मिळेल.

Krushi Yantrikikaran Yojana 2023 साठि पात्रता

  • शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
  • शेतकर्‍याच्या नावावर जमीन असावी.
  • अर्जदार जर अनुसूचीत जाती किंवा जमाती या विभागात मोडत असेल तर त्यांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • ट्रॅक्टर साठी अनुदान हवे असेल तर शेतकर्‍याच्या नावावर ट्रॅक्टर असावे.

कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 ऑनलाइन अर्ज

तुम्हाला जर Krushi Yantrikikaran Yojana 2023 चा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.

  • वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर कृषी विभागाचे मुखपृष्ठ उघडेल.
  • मुखपृष्ठावरच तुम्हाला Online Application किंवा Link 2 असे पर्याय दिसतील तुम्हाला त्यापैकि कोणत्याही एका पर्यायवर क्लिक करावे लागेल.
  • नंतर पुढील पृष्ठावर तुमच्या समोर Krushi Yantrikikaran Yojana 2023 चा अर्ज उघडेल.
  • अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अचूक भरावी लागेल. (चुकीची माहिती आढल्यास तुम्ही पात्र ठरणार नाही)
  • सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला Submit Button वर क्लिक करावे लागेल.

अश्या प्रकारे तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजना 2023 साठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

अर्ज भरतांना तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही खाली कमेन्ट टाकून आम्हाला विचारू शकता.

 

Leave a Comment