Thibak Sinchan Tushar Sinchan Anudan Yojana Maharashtra 2022: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा अंतर्गत) ठिबक आणि तुषार सिंचन योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या ठिबक आणि तुषार सिंचन योजनेचे उद्दिष्ट्य काय, लाभार्थी निवडीचे निकष, अनुदान किती असणार, आवश्यक कागदपत्रे कोणती , अर्ज कुठे करायचा, योजनेत समाविष्ट असणारे घटक कोणते. या सर्व घटकांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
ठिबक सिंचन तुषार सिंचन योजना 2022
हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळे राज्याच्या हवामान बदलाविषयी कृती आराखडा मध्ये नमूद केले आहे. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र शासनाने सन २०१७-१८ मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना प्रती थेंब अधिक पिक केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना राबविण्यासाठी कार्यात्मक मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तसेच राज्य शासनाने सन २०१८-१९ या वर्षात करिता सूक्ष्म सिंचन योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहेत. सदर योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सुक्ष्म सिंचन योजना ठिबक व तुषार सिंचन राबवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्रकल्पांतर्गत प्रथम टप्प्यात निवडलेल्या गावांमध्ये सूक्ष्म सिंचन ठिबक व तुषार सिंचन हा मंजूर घटक राबविण्यात येत आहे.
ठिबक सिंचन व तुषार सिंचन योजनेचे उद्दिष्टे –
- प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्रात वाढ करणे.
- आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी व फलोत्पादन पिकांचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीस चालना देणे.
- कृषी उत्पादनाची गुणवत्ता आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पादनात वाढ करणे.
- जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे.
लाभार्थी निवडीचे निकष –
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सूक्ष्म सिंचन या योजनेसाठी अत्यल्प व अल्पभूधार,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग, शेतकरी व सर्वसाधारण या प्राधान्य क्रमानुसार लाभार्थी निवड करण्यात येईल.
- शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी. सामुहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर सर्व संबंधितांचे करारपत्र आवश्यक आहे.
- उपलब्ध सिंचन स्त्रोतातील पाण्याचा विचार करून, तेवढ्या क्षेत्रासाठी सूक्ष्म सिंचनाचा लाभ हा देय असणार आहे.
- विद्युत पंप करिता कायमस्वरूपी जोडणी आवश्यक आहे.
- ज्या पिकाकरिता संच बसविण्यात येणार आहेत. या पिकाची नोंद सातबाराचा उतारा वर क्षेत्रासह असावी. सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद नसल्यास कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून पीक लागवडीचे प्रमाणपत्र घ्यावे.
या योजनेसाठी समाविष्ट असणाऱ्या बाबी –
ठिबक सिंचन –
- आउटलाइन
- सबसरफेस
- मायक्रोजेट
तुषार सिंचन –
- सूक्ष्म तुषार सिंचन
- मिनी तुषार सिंचन
- हलविता येणारी तुषार सिंचन
- मिस्टर रेनगन
- सेमी परमनंट इरिगेशन सिस्टीम
नानाजी देशुमख अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी अनुदान किती?
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या आर्थिक मापदंडानुसार अल्प व अत्यल्प भूधारक अनुसूचित जाती व जमाती मधील लाभार्थ्यांना ७० टक्के अनुदान असणार आहे.
अल्प व अत्यल्प भूधारक सर्वसाधारण लाभार्थींना ६० टक्के अनुदान देय असणार आहे.
स्तावासाठी आवश्यक कागदपत्रे –
- पाणी व मृदा तपासणी अहवाल
- कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सूक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र
- भौगोलिक स्थान पद्धतीने शेतकरी व तपासणी अधिकारी समवेत संचाचे अक्षांश आणि रेखांश फोटोची प्रत
- विक्रेते किंवा वितरक यांच्याकडील बिलांची मुळप्रत टॅक्स इनव्हाईस.
अर्ज कुठे करायचा?
सदर योजनेचा इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि सदर योजनेचा अवश्य घ्यावा.