डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेद्वारे खालील गोष्टींवर अनुदान मिळणार 

राज्य सरकार या योजनेअंतर्गत नवीन विहिर बांधण्यासाठी, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरींग, पंप संच, वीज जोडणी, शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण,सुक्ष्म सिंचन संच(ठिबक सिचन आणि तुषार सिंचन) ,पीव्हीसी पाईप, परसबाग इ. गोष्टींसाठी अनुदान देणार आहे.

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ केवळ अनुसुचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना देय आहे.”
  • “बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा (क्षेत्रांतर्गत / क्षेत्राबाहेरील)लाभ केवळ अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना देय आहे.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन अनुदान कोणत्या जिल्यांसाठी लागू असणार आहे?

मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत (महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना )अनुदान किती मिळणार आहे?

  • नवीन विहिर बांधण्यासाठी– रु. २,५०,००० (अडीच लाख )
  • जुनी विहीर दुरुस्ती– रु. ५०,००० (पन्नास हजार)
  • इनवेल बोअरींग– रु. २०,००० (वीस हजार )
  • पंप संच– रु. २०,००० (वीस हजार )
  • वीज जोडणी– रु. १०,००० (दहा हजार )
  • शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण– रु. १,००,००० (एक लाख)
  • सुक्ष्म सिंचन संच– ठिबक सिंचन ५०,०००(पन्नास हजार) किंव्हा तुषार सिंचन २५,००० (पंचवीस हजार)
  • पीव्हीसी पाईप– रु. ३०,००० (तीस हजार)
  • परसबाग– रु. ५०० (पाचशे)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2023 अर्जदार आवश्यक पात्रता 

  • लाभार्थी शेतकरीअनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • जमिनीच्या ७/१२ व ८-अ चा उतारा सादर करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थीं शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असणे बंधनकारक असणार आहे.
  • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थीची जमिनधारणा ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर) असणे गरजेचे असणार आह

कृषी स्वावलंबन योजना 2023 आवश्यक कागदपत्रे | Swavalamban yojana in marathi

A. नवीन विहीरीकरीता आवश्यक कागदपत्रे :

  • अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
  • ७/१२ व ८-अ चा उतारा
  • तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र ( रु. १,५०,०००/- पर्यंत).
  • लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(१००/५०० रु च्या स्टॅम्प पेपरवर)
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (०.४० ते ६ हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून ५०० फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
  • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
  • कृषि अधिकारी यांचे क्षेत्र पाहणी व शिफारसपत्र
  • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
  • ज्या जागेवर विहीर खोदायची आहे त्या त्या जायचा विशिष्ट खुणेसहित लाभार्थ्यासहित फोटो.
  • ग्रामसभेचा ठराव

 

जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग आवश्यक कागदपत्रे –

  • सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
  • तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. १,५०,०००/- पर्यंत).
  • जमीन धारणेचा अदयावत ७/१२ दाखला व ८अ उतारा.
  • ग्रामसभेचा ठराव.
  • तलाठी यांचेकडील दाखला – एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (०.२० ते ६ हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
  • लाभार्थीचे बंधपत्र (१०० किंव्हा ५०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर).
  • कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्र पाहणी व शिफारस पत्र
  • गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र
  • ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती किंव्हा इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा काम सुरू होण्यापूर्वीचा विशिष्ट खुणेसहित आणि लाभार्थ्यासहित फोटो
  • इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र

शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / सूक्ष्म सिंचन संच आवश्यक कागदपत्रे:

  • सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
  • तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. १,५०,०००/- पर्यंत ).
  • जमीन धारणेचा अदयावत ७/१२ दाखला व ८अ उतारा.
  • तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला.  (०.२० ते ६ हेक्टर मर्यादेत)
  • ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
  • शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमी पत्र (१००/५०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)
  • काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
  • विद्युत कनेक्शन व विद्युत पंप संच नसले बाबत हमी पत्र
  • प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.

वरील सर्व माहिती वाचून जर लाभ घेण्यास पात्र असाल, तर महाडीबीटी पोर्टल वर जाऊन लवकरच अर्ज भरून घ्या. 

 

Dr. Babasaheb Ambedkar Agricultural Self-Dependence Scheme

Leave a Comment