राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये फळझाडांना, पालेभाज्या पिकाच्या सभोवताली तयार केलेली प्लास्टिक फिल्म असते. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकतो . तसेच पिकामध्ये तणांची वाढ देखील ही त्यामानाने कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग हा फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिके घेताना केला जातो.
रा फ अ अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान किती, आवश्यक पात्रता, प्लास्टिक मल्चिंग पेपर चे लाभ कोणते, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कोठे करावा, इत्यादी सर्व घटकांची माहिती पाहणार आहोत.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान किती असणार आहे?

 • अनुदान हे सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रति हेक्‍टर रुपये ३२,००० असून या खर्चाच्या ५०टक्के म्हणजेच जास्तीत जास्त १६,००० रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे कमाल दोन हेक्‍टर क्षेत्र मर्यादेपर्यंतच अनुदान देय आहे.
 • जर डोंगराळ क्षेत्र असेल, तर प्रति हेक्‍टर हे ३६,८००/- रुपये मापदंड असणार आहे.या खर्चाच्या ५०टक्के म्हणजेच जास्तीत जास्त १८,४००/- रुपये प्रति हेक्‍टर याप्रमाणे दोन हेक्‍टर क्षेत्र मर्यादितसाठी अनुदान देय असणार आहे.

प्लास्टिक मल्चिंग पेपर चे लाभ कोणते?

 • वनस्पतींची मुळे चांगली वाढतात.
 • शेतातील मातीची धूप रोखते.
 • तण पासून संरक्षण
 • शेतात पाण्याचे ओलावा कायम राखते आणि बाष्पीभवन रोखते.
 • बागवानीमध्ये तण नियंत्रित करते आणि वनस्पतींसाठी दीर्घ काळापासून संरक्षण करते.
 • हे जमीन कडक होण्यापासून वाचवते.

रा फ अ अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेसाठी कोण सहभागी होऊ शकते त्यासाठी आवश्यक पात्रता काय?

 • शेतकरी
 • बचत गट
 • शेतकरी उत्पादक कंपनी
 • शेतकरी समूह
 • सहकारी संस्था या योजनेमध्ये सहभागी होऊन अर्थसहाय्य घेऊ शकतात.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गतऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती ?

 • आधार कार्डची छायाप्रत
 • आधार संलग्न असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स
 • ७/१२ उतारा
 • ८-अ प्रमाणपत्र

विविध पिकांकरिता वापरावयाची मल्चिंग फिल्म कोणती?

 • ज्या पिकांना ११-१२ महिने कालावधी लागतो. म्हणजे उदाहरणार्थ पपई यांसारख्या फळपिकांना – ५० मायक्रोन जाडीची यु व्ही प्लास्टिक फिल्म वापरली जाते.
 • ३-४ महिन्याच्या कालावधीत येणारे पिकांसाठी म्हणजेच उदाहरणार्थ भाजीपाला, स्ट्रॉबेरी इत्यादींसाठी – २५ मायक्रोन जाडीची युवी स्टॅबिलायझर फिल्म वापरली जाते.
 • जास्त कालावधी घेणारी पिके म्हणजेच १२ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी घेणाऱ्या सर्व पिकांसाठी – १०० किंवा २०० मायक्रॉन जाडीची यु व्ही स्टॅबिलायझर प्लास्टिक फिल्म वापरली जाते.

 

अर्ज कोठे करावा?

या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी, यांच्याशी संपर्क करावा. या योजनेची अधिक माहिती मिळवावी.

 

Leave a Comment