शासन आपल्या दारी योजना, आता सर्व योजना घर बसल्या Shasan Aplya Dari Yojana 2023

नमस्कार मित्रांनो, आज आपण शासन आपल्या दारी योजना 2023 योजनेचे मिळणारे लाभ, यामधे योजना काय काय असतील, सर्व योजना घर बसल्या मिळणार या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, योजनेमागचा मुख्य उद्देश, आणि योजना काय काय असतील हे पाहायचं असेल, तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे shasan aaplya dari yojana लाभ कोणते? शासन आपल्या दारी योजना 2023 योजना काय काय असतील? सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Shasan Aplya Dari Yojana 2023

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे. बर्‍याचदा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा नागरिकांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

“Shasan Aplya Dari Yojana” या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल, अशी हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील “शासन आपल्या दारी” या लोकाभिमुख योजनेच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार सदानंद चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आपला उद्देश प्रामाणिक असला म्हणजे सर्व बाजूने लोक सोबत जोडले जातात. “शासन आपल्या दारी” हे अभियान देशात विक्रमी ठरेल आणि महाराष्ट्राचे उदाहरण देशासमोर राहील याची मला खात्री आहे. Shasan Aplya Dari हे एक क्रांतिकारी अभियान राज्यात सुरु झाले आहे. १३ मे रोजी पाटण येथून संपूर्ण राज्यात या अभियानाची सुरुवात झाली. आज २५ मे म्हणजे केवळ बारा दिवसांत लाखो लाभार्थींची नोंद यात होत आहे हे विशेष आहे.

शासन आपल्या दारी योजना

‘शासन आपल्या दारी’ या अभियानावर मुख्यमंत्री सचिवालयाचे पूर्ण नियंत्रण आणि देखरेख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, वीर सावरकर या महापुरुषांची भूमी असलेल्या रत्नागिरीत ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे, याचा आनंद होत आहे.

या अभियानाचा लाभ अधिकाधिक लोकांना व्हावा म्हणून आपण आता माहिती तंत्रज्ञानाची मदत घेतो आहोत. महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून आपण योजनांचा लाभ घेऊ शकता. जिल्ह्यातील एमएससी आयटी केंद्रे, सीएससी केंद्रे तसेच कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून तेथील स्वयंसेवकांची मदत घेऊन आपण नोंदणी करू शकता आणि Shasan Aplya Dari योजनांचा लाभ घेऊ शकतात.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर, प्रत्यक्ष क्षेत्रावर उतरली पाहिजे. अशा सर्व यंत्रणांना सूचना होत्या. आज ग्राम सेवक, तलाठी, प्रांत अधिकारी स्वतः गावोगावी जाऊन नागरिकांना भेटत आहेत आणि लाभ देत आहेत, योजनांची माहिती देत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यात या अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. अहमदनगर जिल्हा तसेच ठाणे जिल्ह्याने सुद्धा यापासून प्रेरणा घेत या अभियानासाठी नोंदणी शिबिरे घेतली आहेत.

कल्याणमध्ये दीड लाख लाभार्थींना लाभ देत आहोत. गडचिरोलीसारख्या ठिकाणी दोन महिन्यात एक लाख लाभार्थीची नोंद झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात ७५ हजार, तालुक्यात १५ हजार आणि गावात किमान १०० लाभार्थीना Shasan Aplya Dari योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे यादृष्टीने सर्व तयारी झाली आहे. या अभियानासाठी १६ हजार योजना दूत नेमले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे.

प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरू केले आहेत. गेल्या 11 महिन्यात ३५ मंत्रिमंडळ बैठका आणि त्यातून ३५० निर्णय हे सर्वसामान्य माणसांच्या हिताचे घेण्यात आले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सुखी समाधानाचे दिवस यावेत, शासनाविषयी जनतेच्या मनात सकारात्मक भावना निर्माण व्हाव्यात हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.

सर्व योजना घर बसल्या मिळणार

शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत ही दोन्ही चाके विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एसटीच्या 50 टक्के सवलतीमुळे महिलांचा प्रवास वाढला आहे. एसटीने दिलेल्या सवलतीमुळे जेष्ठांच्या प्रवासात वाढ झाली आहे.

एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकण विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून कोकणाचा सर्वांगीण विकास साधण्यात येत आहे. कोकणात दहा हजार मल्टिनॅशनल कंपन्यांनी नोंदणी केली आहे. यातून राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. केंद्र सरकार यासाठी मदत करत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होत आहे. मुंबई- सिंधुदुर्ग महामार्ग तयार होणार आहे, त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल असेही त्यांनी सांगितले.

‘शासन आपल्या दारी’ या योजनेविषयी बोलताना पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीतला हा पहिला कार्यक्रम आहे, ज्यात अधिकारी गावोगावी, घरोघरी जाऊन योजना लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत, प्रत्येक वर्गाला लाभ मिळाला पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. रिक्षा चालक आणि मालकांसाठी महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने Shasan Aplya Dari Yojana घेतला आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना या योजनेपासून रत्नागिरी जिल्ह्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली

‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या शुभारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना दुचाकी व तीन चाकी गाड्यांचे वाटप मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

शासन आपल्या दारी योजनेचे मिळणारे लाभ

शासन आपल्या दारी या अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना एका छताखाली लाभ देण्यात येणार आहे .त्याच्यानंतर मित्रांनो शासकीय निर्धारित शुल्कात 200 हून अधिक योजनांचा लाभ कमीत कमी कागदपत्रे आणि जलद मंजुरी  अशा पद्धतीने करण्यात येणार आहे.

योजना काय काय असतील

  • कृषी सेवा केंद्राचे परवाने
  • सेवानिवृत्त लाभ
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • ई-श्रम कार्ड
  • भरती मेळावा
  • पीएम किसान
  • विवाह नोंदणी
  • पीएफ घरकुल योजना
  • मनरेगा
  • जॉब कार्ड
  • मुलींना सायकल वाटप
  • नवीन मतदार नोंदणी
  • शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
  • कृषी प्रदर्शन
  • डिजिटल इंडिया
  • सखी किट वाटप
  • दिव्यांग साहित्य वाटप
  • शिकाऊ चालक परवाना

अशे वेगवेगळे योजनांचा यात समावेश असणार असून, ह्याच योजना आता आपल्या दारी येणार आहे. आणि याच योजनेला शासन आपल्या दारी योजना म्हणतात.

 

 

Leave a Comment